कोरियन ग्लास स्क्रिनसाठी 'हे' 6 खास टिप्स नक्कीच ट्राय करा, मिळवा फ्लोलॅस ग्लो

Jan 11,2025


कोरियन ग्लास स्क्रिन सारख्या नैसर्गिक सौंदर्याची इच्छा कोणाला नसते?


नैसर्गिक चमक असलेली आणि डाग, मुरुमं नसलेली त्वचा सगळ्याच मुलींना आवडते. तर ट्राय करा 'या' 6 टिप्स.

स्टेप 1

एक चमचा तांदळाचे पिठ घ्या. त्यात 1/4 कप दूध मिसळून गरम करा. या मिश्रणाची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा आणि 5 मिनिटे मसाज करून थंड पाण्याने धुवा.

स्टेप 2

कोरियन स्टाईल स्क्रबसाठी एक चमचा रवाळ तांदळाचं पिठ घ्या. त्यात मध आणि कोरफडीचा जेल मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. नंतर थंड पाण्याने धुवा.

स्टेप 3

ब्लॅक हेड काढण्यासाठी कोरियन फेशिअल करताना स्टीम अतिशय उपयुक्त आहे. स्टीम घेताना गरम पाण्यात हळद, लिंबाची पाने आणि तुळसाची काही पाने घाला.

स्टेप 4

मसाजसाठी फ्लेक्स सीड जेलमध्ये (जवस) टाका. व्हिटामिन ई ची कॅप्सूल मिसळून 5 ते 7 मिनिटांसाठी नीट मसाज करा.

स्टेप 5

या स्टेपमध्ये शिजलेल्या भातामध्ये मध आणि एलोवेरा जेल टाका आणि ते फेस पॅक चांगल्याप्रकारे चेहऱ्यावर लावा.

स्टेप 6

शेवटच्या स्टेपमध्ये रात्री तांदूळ भिजत घाला. सकाळी त्यामध्ये गुलाब जल आणि व्हिटामिन ई मिसळून चेहऱ्यावर या पाण्याचा स्प्रे करा.

टीपः

हे कोरियन ग्लास फेशिअल केल्यानंतर 8 तासांपर्यंत कोणत्याही साबणाचा किंवा फेस वॉशचा वापर करू नका.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story