कुठे राहतो सांताक्लॉज, त्याचा पत्ता काय? तो सर्वांना भेटवस्तू का देतो?

Dec 24,2024

नाताळचा सण

नाताळ हा सण येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. हा दिवस लहान मुलांसाठी अत्यंत खास असतो; कारण या दिवशी लहान मुले सांता क्लॉज म्हणजेच नाताळबाबा कडून भेटवस्तूची वाट पाहतात. त्यांच्या मते, नाताळ बाबा येऊन त्यांना भेटवस्तू देऊन जातो.

कुठे साजरा झाला पहिल्यांदा ख्रिसमस

एका रिपोर्टनुसार, चौथ्या शतकात रोम म्हणजेच आताच्या इटली या देशात पहिल्यांदा नाताळ हा सण साजरा केला गेला.

कोणी केली नाताळची सुरूवात

हा सण पहिल्यांदा 336 ई मध्ये ईसाई रोमन सम्राट आणि रोमन सम्राट कॉन्स्टेंटाइनच्या शासनकाळात साजरा केला गेला होता.

25 डिसेंबरच का?

25 डिसेंबरला पोप जुलियसने अधिकृतपणे जिसस क्राइस्टचा जन्मदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.

कोण आहे सांता?

सांताक्लॉज म्हणजेच नाताळ बाबाची कल्पना संत निकोलसपासून मिळाली. संत निकोलस हे चौथ्या शतकातील एक बिशप होते. ते त्यांच्या दया आणि उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते.

सांता क्लॉजच्या घराचा पत्ता

नाताळ बाबाचं घर हे फिनलँड मधील रोवानीमी शहरात स्थित असल्याचं मानलं जातं.

सांताला चिट्ठ्या पाठवणे

दरवर्षी हजारो मुले नाताळ बाबाला आपल्याला हवी असलेली गोष्ट पत्रात लिहितात आणि ते पत्र फिनलँड, अमेरिका आणि कॅनडाच्या वेगवेगळ्या पॉस्ट ऑफिसमधून पाठवलं जातं.

भेटवस्तू आणि मुलांचा विश्वास

आपण जी गोष्ट चिट्ठीत नमूद करतो तीच गोष्ट नाताळ बाबा नाताळच्या दिवशी ख्रिसमस ट्रीच्या खाली ठेऊन जातो.

भेटवस्तू देण्याची परंपरा

आता प्रश्न असा आहे की ही भेटवस्तू देण्याची परंपरा नेमकी कशी सुरु झाली? तर, संत निकोलस हे दरवेळेस गरीबांना देत होते आणि हीच परंपरा ख्रिसमसच्या दिवशी भेटवस्तू देण्याच्या रुपात आजपर्यंत सुरु आहे.

VIEW ALL

Read Next Story