रिकाम्या पोटी दारु प्यावी का? मद्यपान करत असाल तर जाणून घ्या

लग्न, पार्टी, डिनर अशा अनेक कार्यक्रमात लोक आपल्या मित्र, कुटुंबीयांसह मद्यपान करतात.

अनेक लोक मद्यपान करण्याआधी खातात तर काहीजण मद्यपान करतानाच सोबत खात असतात. पण काही लोक रिकाम्या पोटी मद्यपान करतात.

जर तुम्हालाही रिकाम्या पोटी मद्यपान करायची सवय असेल तर आताच थांबा. जाणून घ्या यामागील कारण...

पोट मद्याला शोषित करतं, पण छोट्या आतड्याच्या तुलनेत धीम्या गतीने ही प्रक्रिया सुरु असते.

जर तुम्ही काहीच खाल्लं नसेल तर ती पोटातून वेगाने छोट्या आतड्याकडे पोहोचते आणि अशा स्थितीत लगेचच रक्तात मिसळते.

रक्तात मिसळल्यानंतर मद्य ह्रदय आणि मेंदूपर्यंतही पोहोचतं. ज्यामुळे फार लवकर नशा होते.

रिकाम्या पोटी मद्यपान केल्याने त्याचा प्रभाव वाढतो. ती वेगाने शोषली जाते आणि त्याच वेगात ती चढते.

ही माहिती फूड अँड वाइन एक्स्पर्ट्सच्या हवाल्याने देण्यात आली आहे. यामधून मद्यपानाला प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही.

VIEW ALL

Read Next Story