कडधान्य नसूनही 'या' इवल्याश्या दाण्यांना मोड आणून करा भाजी; स्तनदा मातांपासून तरुणींपर्यंत सर्वांनाच होईल फायदा
हे दाणे इवलेसे दिसत असले तरीही त्यामध्ये असणारे गुणधर्म अनेक रोगांना प्रतिकार करतात. शिवाय यांच्या सेवनामुळं शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं.
मोड आणून भाजी केल्यास या दाण्यांमध्ये असणारी तत्त्वं दुपटीनं वाढतात. हे इवलेसे दाणे आहेत मेथीचे. मेथीमध्ये फायबर असल्यामुळं त्यांच्या सेवनानं पचनक्रिया सुधारते.
स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी मेथीची भाजी किंवा मेथीच्या दाण्यांचा एखादा पदार्थ फायद्याचा ठरतो. यामुळं आई आणि बाळाची प्रकृती उत्तम राहते.
मेथीच्या दाण्यांमुळं पोटाचं आणि पर्यायी तुमच्या त्वचेपासून केसांचंही आरोग्य सुधारतं. यामध्ये असणाऱ्या मॅग्नेशियम, पोटॅशियम असे अँटी इंफ्लेमेटरी गिण असतात.
हृदयाच्या आरोग्यासाठीसुद्धा मेथी अतिशय रामबाण. मेथीच्या सेवनामुळं शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं.
मेथीमध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळं सांध्यांचं आरोग्य सुरळीत राहतं. त्यामुळं मेथीचं सेवन सर्व स्तरांवर तुमच्यासाठी फायद्याचच ठरतं.
वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या