भारतीय संघाचा युवा सलामी फलंदाज शुभमन गिल आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणार आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर गुजरात टायटन्सने हा निर्णय घेतला. त्यामुळे आता शुभमन गिल गुजरातचे नेतृत्व करणार आहे.

गुजरात टायटन्सचा हा निर्णय अनेक दिग्गजांना आवडला नाही. अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्स या निर्णयाशी सहमत नाही.

डिव्हिलियर्सने शुबमन गिलच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्याबाबत असहमती व्यक्त केली आहे. त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाडूला कर्णधार करायला हवं होतं असे एबीचे मत आहे.

यात काही गैर नाही. पण शुभमनला थोडे शिकण्याची संधी द्यायला हवी होती. जेणेकरून तो 2025 मध्ये पूर्णपणे तयार असेल. शुभमन गिलला संघाचे नेतृत्व करताना पाहायला मी उत्सुक आहे, असे एबी डिव्हिलियर्स म्हटलं आहे.

'ज्या क्षणी मी केन विल्यमसनचे नाव रिटेन खेळाडूंच्या यादीत पाहिले तेव्हा मला वाटले की या अनुभवी खेळाडूला कर्णधारपद देण्याची ही उत्तम संधी आहे,' असेही एबी डिव्हिलियर्स म्हणाला.

गुजरात टायटन्सचे कर्णधारपद स्वीकारताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. अशा उत्कृष्ट संघाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी फ्रँचायझीचे आभार मानतो, असे शुभमनने म्हटलं होतं.

VIEW ALL

Read Next Story