सुंदरता तुमच्या दातांतूनही दिसते. पिवळे दात असतील तर इम्प्रेशन वाईट पडते.
दातांच्या स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढत असतो.
तुम्ही घरगुती उपाय करुन पिवळे दात अगदी ट्यूबलाईटप्रमाणे स्वच्छ करु शकता.
दोनवेळा ब्रश करणे आवश्यक असते. काहीजणांचे हे करुनही दात स्वच्छ होत नाहीत. मग दात कसे चमकवायचे? जाणून घेऊया.
दात चमकावण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीचा उपयोग करु शकता.
संत्र्याच्या साली सुकवून त्याची पावडर बनवा. सकाळ, संध्याकाळ दातांवर लावा.
एक चमचा बेकींग सोडा घ्या आणि त्यात थोडासा लिंबूचा रस मिसळा.
हे मिश्रण दातांवर चोळा आणि थोड्यावेळाने साध्या पाण्याने गुरळ्या करा. दात चमकतील.
मीठ आणि राईचे तेल दाताला लावल्यास पिवळेपणा दूर होईल.
अर्धा चमचा मीठ घेऊन त्यात राईच्या तेलाचे काही थेंब टाका आणि दातांची मालिश करा.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)