देशातील प्रमुख कंपनी Okaya ने आता आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर Okaya MotoFast ला लाँच केलं आहे.

कंपनी याला स्कूबाइक (ScooBike) म्हणत आहे, कारण यामध्ये बाईक आणि स्कूटर दोन्हीतील फिचर्स आहेत.

आकर्षक लूक आणि पॉवरफूल बॅटरी असणाऱ्या या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी 1,36,999 रुपये मोजावे लागणार आहेत.

2500 रुपये देत कंपनीची बेवसाइट किंवा अधिकृत डिलरशिपच्या माध्यमातून ही स्कूटर तुम्ही बूक करु शकता.

कंपनी पुढील महिन्यात दिल्ली आणि जयपूरमध्ये या स्कूटरची डिलिव्हरी सुरु करत आहे.

कंपनीने ही स्कूटर 7 रंगात लाँच केली आहे. दैनंदिन वापरासाठी ही स्कूटर फार चांगली असल्याचा कंपनीचा दावा आहे.

या स्कूटरमध्ये 3.53 kWh क्षमेची बॅटरी दिली आहे. सिंगल चार्जमध्ये ही बॅटरी 110 ते 130 किमी ड्रायव्हिंग रेंज देते असा दावा आहे.

स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 70 किमी आहे. चांगली रेंज मिळावी यासाठी स्कूटरमध्ये ड्युअल बॅटरी सिस्टम वापरली आहे.

बॅटरी फूल चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. बॅटरी आणि मोटरवर 3 वर्षं किंवा 30 हजार किमीपर्यंतची वॉरंटी मिळते.

स्कूटरमध्ये तीन ड्रायव्हिंग मोड आहेत. दोन्ही चाकात कॉम्बी डिस्क ब्रेकिंग सिस्टम, टचस्क्रीन इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, डायमंड कट अलॉय आणि 12 इंच ट्यूबलेस टायर मिळतो.

VIEW ALL

Read Next Story