साखरेऐवजी गुळ का खावा? जाणून घ्या फायदे
गुळात शरीरिरासाठी गरजेची असलेली खनिजे असतात. गुळात आयर्न,पोटेशियम,मैग्नेशियम सारखी खनिजे असतात.
गुळात ग्लायसेमिक निर्देशांक कमी असतो आणि गुळ मधुमेह होण्याएवढी रक्तातील साखर वाढवत नाही.
गुळ साखरेपेक्षा कमी परिष्कृत प्रक्रीयेतून तयार करतात, त्यामुळे गुळात जास्त पोषकतत्त्वे असतात.
गुळात फायबर असते जे पचन प्रक्रीया सुलभ बनवते.आणि पोटाचे विकार कमी करण्यास मदत करते.
गुळात अँन्टीऑक्सिडंटस् असतात.अँन्टीऑक्सिडंटस् बाह्यजंतूंशी लढण्याची शारीरिक शक्ती वाढवतात.
गुळात 'सी' जीवनसत्त्व असते . हे जीवनसत्त्व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फार महत्त्वाचे असते. (Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)