किचन सिंकमध्ये सतत पाणी तुंबतं? 'हे' उपाय वापरून घरीच करा साफ

स्वयंपाकघरातील सिंकमध्ये भांडी घासताना अनेकदा पाणी तुंबते, त्यामुळं गृहिणींची चिडचिड होते.

जेवणानंतरचे खरकटे, चहाचा गाळ किंवा चिकट पदार्थ सिंकच्या पाइपमध्ये अडकल्याने सिंक तुंबते, अशावेळी आपण लगेच पंबरला बोलावतो. पण तुम्ही घरच्या घरीही ब्लॉक झालेले सिंक साफ करु शकता

किचन सिंकची जाळी काढून त्यात २-३ लिंबू पिळून त्यावर १ इनो टाकून काहीवेळ तसंच ठेवून द्या. त्यानंतर किचन सिंकच्या पाईपमध्ये गरम पाणी टाका. असे केल्याने पाइपमधील घाण लगेच साफ होईल.

किचन सिंकच्या तोंडाभोवती बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस टाकून ठेवा. थोड्यावेळाने एका ब्रशच्या सहाय्याने जाळी साफ करुन घ्या. या ट्रिकने जाळी लगेचच स्वच्छ होईल व नव्यासारखी चमकेल.

किचनच्या पाइममध्ये व्हिनेगर टाकल्यास आतला चिकटपणा निघून जाईल व पाइपात साचून राहिलेली घाणही कमी होईल.

किचन सिंकच्या तोंडाशी चमचाभर मीठ टाका आणि काही वेळ ते तसेच राहू द्यात. त्यानंतर त्यावर गरम पाणी ओता

किचन सिंक ब्लॉक होऊ नये यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा किचन सिंक स्वच्छ करावे.सिंक ड्रेनच्या वर जाळीचे कव्हर लावावे यामुळे अन्न आणि कोणताही कचरा पाइपमध्ये जाणार नाही

VIEW ALL

Read Next Story