रेल्‍वे तिकिटासाठी कोट्यवधी प्रवासी ऑनलाईन सेवेचा लाभ घेतात. यासाठी आयआरसीटीसी ( Indian Railway Catering and Tourism Corporation) ॲपचा वापर होतो.

Aug 10,2023


रेल्‍वे तिकीट बुकिंगपासून ते खाद्यपदार्थ बुकिंगपर्यंत सर्व ॲपचा माध्‍यमातून केल्‍या जातात. मात्र तुम्‍हाला माहित आहे का? ऑनलाईन रेल्‍वे तिकिट बुकिंग करताना तुम्‍ही केलेली छोटी चूक तुमचं बॅक खाते रिकामे करु शकते.


आयआरसीटीसीच्या बोगस ऍपवरुन प्रवाशांना फसवण्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. त्यामुळे आयआरसीटीसीनं ग्राहकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय.


आयआरसीटीसी रेल कनेक्ट नावाच्या ऍप बोगस असल्याचं आयआरसीटीसीनं म्हटलंय. हे ऍप अँड्रॉईड फोन वापरणाऱ्या ग्राहकांना टार्गेट करतंय.


ग्राहकांनी हे ऍप डाऊनलोड करु नये अशी सूचना अधिकृत आयआरसीटीसीनं ई मेल द्वारे केलीय. या मेलमध्ये बोगस ऍपचा एक स्नॅपशॉटही देण्यात आलाय.


आयआरसीटीसीचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी हे बनावट अॅट तयार करण्यात आलं असून प्रवाशांची फसवणूक करण्यात येत आहे. त्यावर क्लिक केल्यास खात्यांतील पैसे काढून घेण्यात येत आहेत.


केवळ गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरूनच आयआरसीटीसी रेल कनेक्ट मोबाइल अ‍ॅप वापरावेत असं आवाहन करण्यात आलं आहे.


नागरिकांनी आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळाला आणि अ‍ॅपबाबत अडचणी सोडवण्यासाठी आयआरसीटीसी कस्टमर केअरशी संपर्क साधावा. अशी माहिती आयआरसीटीसीने अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.

VIEW ALL

Read Next Story