चौपाटीवरची किंवा ठेल्यावरच्या भेळीला एक वेगळीच चव असते. अशी भेळ घरी करायला गेल्यावर चव बदलते.
ठेल्यावरची भेळ बनवण्यासाठी एक वेगळा मसाला वापरला जातो. हा सिक्रेट मसाला कसा बनवायचा याची सोपी रेसिपी जाणून घेऊया
कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, पुदिना, आलं (बारीक चिरुन घ्या), कडीपत्ता, चणा डाळ (भाजून घेतलेली)
जिरं, हिंग, चाट मसाला, सैंधव मीठ, आमचूर पावडर, तेल, मीठ चवीनुसार.
ड्राय भेळ मसाला बनवण्यासाठी वरील सर्व साहित्य एका मिस्करच्या भांड्यात एकत्रित करुन घ्या.
आता हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये दोनदा वाटून घ्या. थोडी जाडसर पावडर झाल्यानंतर एका हवाबंद बाटलीत हा मसाला भरुन ठेवा.
ड्राय भेळ मसाला हवाबंद बाटलीत भरुन तो फ्रीजमध्ये ठेवलास चांगला 1 ते 2 महिने टिकतो
आता कुरमुरु, कांदा-टॉमेटो बारीक चिरुन व उकडलेला बटाटा, फरसाण व शेव, डाळ आणि तयार केलेली ड्राय भेळ मसाला टाकून घरी सुकी भेळ बनवा