भारताचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टॅनकोविक यांना एक मुलगा असून त्याचं नाव अगस्त्या असं ठेवण्यात आलं आहे.

भरताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लेकीचं नावही खूप खास आहे. त्यांनी आपल्या लेकीचं नाव वामिका असं ठेवलं असून हे नाव देवी दुर्गा मातेशी संबंधित आहे.

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोणीच्या लेकीचं नाव झिवा असं आहे. झिवाचा अर्थ चमकदार, दैदीप्यमान, तेजस्वी असा होतो.

टीम इंडियाच कर्धणार आणि हिटमॅन रोहित शर्माच्या मुलीचं नाव समायरा असं आहे. समायरा' या नावाचा अर्थ आहे आराधना, जप करणे, ईश्वराची पूजा करणे.

टीम इंडियाचा माजी क्रिकेपटू सुरेश रैनाला दोन मुलं असून आपल्या मुलांची नावं त्याने अगदी युनिक ठेवली आहे. मुलीचं नावं ग्रेसिया असं आहे तर मुलाचं नाव रियो ठेवलंय.

भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग आणि पत्नी गीता बसरा यांच्या मुलांची नावं अगदी ऐतिहासिक आहेत. मुलीचं नाव हिनाया हिर आणि मुलाचं नाव जोहान वीर असं ठेवण्यात आलं आहे.

टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्याच महिन्यात बापमाणूस झालाय, त्याची पत्नी संजना गणेशनने गेल्याच महिन्यात गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचं नाव त्यांनी अंगद असं ठेवलंय.

टीम इंडियाचा आक्रमक सलामीवीर शिखर धवन याचा नुकताच घटस्फोट झाला. त्याच्या मुलाचा ताबा सध्या पत्नीकडे आहे. शिखरच्या मुलाचं नाव जोरावर असं आहे.

टीम इंडियाचा मराठमोठा फलंदाज अजिंक्य रहाणे दोन मुलं असून त्यांची नावंही मराठमोळी आहेत. मुलीचं नाव आर्या तर मुलाचं नाव राघव असं आहे.

VIEW ALL

Read Next Story