'या' 7 बिया खा, शुक्राणूंच्या संख्येत होईल नैसर्गिक वाढ

Jun 27,2023

अनियमित जीवनशैली

अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी होऊ लागते.

शुक्राणूंची संख्या वाढविणाऱ्या बिया

शुक्राणूंची संख्या नैसर्गिकरित्या वाढविण्यासाठी तुमच्या आहारात काही बियांचा समावेश करणे आवश्यक आहे. या कोणत्या बिया आहेत, ते जाणून घ्या.

सूर्यफूल बिया

सूर्यफुलाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-3, झिंक आणि व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळतात, जे शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी फायदेशीर असतात.

तीळ

तिळाच्या बियांमध्ये सेसमोलिन, एपिसमीन आणि टोकोफेरॉल संयुगे असतात, जे पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करतात.

चिया बिया

साल्विया हिस्पॅनिका नावाच्या वनस्पतीपासून चिया बिया मिळतात. या बिया गडद तपकिरी रंगाच्या आणि आकाराने लहान असतात. चिया बियांमध्ये औषधी मूल्य आहे. फायबरचे प्रमाण जास्त आहे. या सुपरफूडमध्ये जीवनसत्त्वे सी, ई, नियासिन, थायामिन, अँटिऑक्सिडंट्स, रिबोफ्लेविन असतात जी मानवी आरोग्यासाठी आवश्यक असतात.

मथीचे दाणे

मेथीचे दाणे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन सुधारतात. ज्यामुळे शुक्राणूंची संख्या वाढण्यास आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

खसखस

खसखसमध्ये झिंक, सेलेनियम, व्हिटॅमिन-ई आणि व्हिटॅमिन-सी सारखे पोषक घटक असतात, जे शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करतात.

अळशीच्या बिया

अळशीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन-ई मुबलक प्रमाणात असतात, ते शुक्राणूंची गुणवत्ता आणि शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करतात.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-3 आणि झिंक आढळतात, जे पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करतात.

VIEW ALL

Read Next Story