लक्ष्मी प्रसन्न झाल्यास घरात धन, सुख यांची भरभराट

सनातन धर्मात लक्ष्मीला धनाची देवी मानण्यात आलं आहे. लक्ष्मीचा ज्या घरात वास असतो तिथे कधीच धन, सुख यांची कमतरता भासत नाही.

पाच सवयींमुळे नाराज होते लक्ष्मी

असं म्हणतात की, काही गोष्टींमुळे लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते. अशा स्थितीत घरावर नेहमीच पैशांची चणचण भासते.

दिवा

घरात दिवा, वात कधीही फुंकून लावू नका.. यामुळे कधीही लक्ष्मी प्रसन्न होत नाही.

नखं चावणे

शास्त्रांमध्ये नखं चावणं फार वाईट सवय असल्याचं सांगण्यात आलं आहे. असं म्हणतात की, जे लोक नेहमी नख चावत असतात त्यांच्यावर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही.

अपमान

ज्या घरात महिला किंवा ज्येष्ठांचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही. त्यामळे ही सवय असेल तर तात्काळ बदला.

खरकटं अन्न

ज्या घरात लोक अन्नावरुन मधेच उठतात किंवा ताटात सोडून देतात त्यांच्या घरात लक्ष्मी थांबत नाहीत.

झोप

जे घर सूर्योदय झाल्यानंतरही उशिरापर्यंत झोपलेले असतात, अशा घरांमध्ये लक्ष्मी प्रवेश करत नाही. त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.

उपाय काय?

लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीसमोर दिवा लावत जावा. मंदिरात श्रीयंत्राची स्थापना आणि नामजप करा.

VIEW ALL

Read Next Story