ODI World Cup 2023

'राउंड रॉबिन फॉर्मेट' म्हणजे काय रे भाऊ?

वेळापत्रक जाहीर

आयसीसी विश्वचषक 2023 चं वेळापत्रक जाहीर झाले आहे. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला सुरूवात होणार असून सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नेमका प्रकार काय ?

यंदाचा वर्ल्ड कप हा राउंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. पण राउंड रॉबिन फॉरमॅट हा नेमका प्रकार काय असतो?

समान संधी

या फॉरमॅटमध्ये, सर्व सहभागी संघ एकमेकांविरुद्ध एकदाच खेळतात, प्रत्येक संघाला स्पर्धेतील इतर प्रत्येक संघाविरुद्ध स्पर्धा करण्याची समान संधी आहे.

पारदर्शक फॉरमॅट

प्रत्येक संघाला ताकद अजमावण्याची संधी मिळत असल्याने सर्वात पारदर्शक असा हा फॉरमॅट मानला जातो.

1992 विश्वचषक

राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने सर्वात आधी 1992 मध्ये विश्वचषक स्पर्धा झाली होती.

राउंड रॉबिन पद्धत

मागील वर्ल्ड कपमध्ये म्हणजे 2019 मध्ये देखील राउंड रॉबिन पद्धतीने वर्ल्ड कप खेळवला गेला होता. भारताला सेमीफायनलमधून बाहेर पडावं लागलं होतं.

2011 वर्ल्ड कप

त्याआधी, 2011 मध्ये झालेला वर्ल्ड कप हा ग्रुप स्टेज आणि नॉकआउट फॉरमॅटमध्ये झाला होता.

वर्ल्ड कप 2023

दरम्यान, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका या देशांनी वर्ल्ड कपमधील आपलं स्थान पक्कं केलंय.

VIEW ALL

Read Next Story