पपई आरोग्यासाठी लाभदायक

पपई ही आरोग्यासाठी फार चांगली मानली जाते. पपई खाल्ल्याने शरिराला अनेक फायदे होतात.

पपईच्या बियांचे फायदे

पण अनेकदा लोक पपई खाताना बिया फेकून देतात. पण पपईच्या बियाही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे फायदे समजल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

पचन

पपईच्या बियांमध्ये पैपिन एंजाइम असतं, जे पचनात मदत करतं. जेवल्यानंतर या बिया खाल्ल्यास प्रोटीन मिळतं तसंच पचनात मदत होते. याशिवाय सूज, बद्दकोष्ठतासारखे त्रास कमी होतात.

यकृतासाठी फायदेशीर

पपईच्या बिया लिव्हरसाठीही फार फायद्याच्या असतात. यामध्ये असे कंपाऊंड्स असतात, जे लिव्हरला डिटॉक्सिफाय करण्यात आणि नुकसान होण्यापासून वाचवतात.

अँटीबॅक्टेरियल

पपईच्या बियांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात, जे तुम्हाला अनेक संसर्गांशी लढण्यास मदत करतात. या बिया बारीक करुन तुम्ही सॅलडवर टाकून खाऊ शकतो.

सूज कमी करण्यात मदत

पपईच्या बिया खाल्ल्यास शरिरातील सूज कमी होते. या बियांचं सेवन केल्याने अर्थरायटिस आणि ह्रदयाशी संबंधित आजारांपासून सुटका होऊ शकते.

प्रतिकारशक्ती

पपईच्या बियांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंट्स असतात, जे प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात. रोज पपईच्या बिया खाणं आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं.

त्वचा आणि केस

पपईच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडेंट्स, विटॅमिन्स आणि मिरल्स असतात जे तुमच्या स्कीन आणि केसांच्या आरोग्यासाठी फार उपयोगी असतात.

ह्रदय

पपईच्या बियांमध्ये फेनोलिकसारखे अँटीऑक्सिडेंट्स असल्याने हे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि ह्रदयाशी संबंधित आजारांना कमी करण्यात मदत करतं. या बिया कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यात आणि ब्लड प्रेशर योग्य ठेवण्यात मदत करतात.

ही सामान्य माहिती असून, तुम्हाला काही समस्या जाणवत असेल तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.

VIEW ALL

Read Next Story