संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे ही जाहिरात आपण लहानपणापासून ऐकत आहोत. अंडी खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे प्रत्येकाला माहिती आहे.
अंड्यामध्ये प्रोटिन्ससोबत कॅल्शियम, विटामिन, मिनरल असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पण काही आजारपणात अंडी खाणं आरोग्यासाठी हानीकारक ठरतं. कुठल्या लोकांनी अंडी खाऊ नयेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहात.
तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर अंड्यामधील पिवळा भाग तुम्ही चुकूनही खाऊ नयेत.
मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांना अनेक पदार्थ्यांवर बंदी असते. त्यातील एक अजून पदार्थ आहे तो म्हणजे अंडी. अंडीचं सेवन मधुमेहाच्या नुकसानदायक आहे.
जर तुम्हाला लुज मोशनचा त्रास होतो आहे. अशा स्थितीत चुकून या लोकांनी अंडी खाऊ नयेत. कारण अंडी ही गरम असतात लुज मोशनचा त्रास असेल तर तुमची समस्या वाढू शकते.
अंड्यातून मोठ्या प्रमाणात प्रोटीन आपल्याला मिळतात. पण प्रोटीनचं सेवन जास्त प्रमाणात केल्यास तुमच्या किडनीवर त्याचा परिणाम होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)