डिसेंबरच्या अखेरीस शाहरुख आणि सुहाना तिच्या आगामी चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यासाठी एकत्र बसणार असल्याचं बोललं जात आहे.

शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्ष त्याच्या कारकिर्दीतील सर्वात उज्ज्वल वर्षांपैकी एक ठरलं आहे.

या वर्षाची सुरुवात त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण'ने केली आणि त्यानंतर 'जवान'ने बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत सगळ्या बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकलं.

त्याच्या आगामी 'डिंकी' या चित्रपटाबाबतही अशाच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. आता बातमी आहे की, शाहरुखसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटात मुलगी सुहानासोबत दिसणार आहे.

सुहानाचा हा मोठ्या पडद्यावरचा डेब्यू चित्रपट असेल. मात्र त्याआधी सुहाना नेटफ्लिक्स शो 'द आर्चीज' मधून ओटीटीवर एन्ट्री घेणार आहे.

वडील आणि मुलीच्या या जोडीचा हा पुढचा चित्रपट अॅक्शन पॅक्ड थ्रिलर असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आता या चित्रपटाचं नावही समोर आलं आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार या सिनेमाचं नाव 'किंग' असेल. या सिनेमाचं शूटिंग जानेवारीपासून सरु होणार असल्याचं बोललं जात आहे.

VIEW ALL

Read Next Story