गरोदर महिलांसाठी चण्यांचं सेवन करणं फायद्याचं असतं.
अंगदुखी आणि सूज आली असेल तर त्यापासून आराम मिळवण्यातही चण्यांच्या सेवनाचा फायदा होतो.
शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर चण्यांचं सेवन केल्यास फार फायदा होऊ शकतो.
हाडं आणि शरीरांना मजबुती मिळवून देण्यासाठी चणे फायद्याचे.
हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होण्यास चण्यांमुळे मदत होते.
नसांमधील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
चणे खाल्ल्याने कॅन्सरचा धोकाही कमी होतो असं सांगतात.
चण्यांचं सेवन केल्याने वाढलेलं वजन नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते.
बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणे, अॅसिडीटीच्या समस्यांवर मात मिळवण्यासाठी चणे चांगला पर्याय आहे.
मधुमेहाचा त्रास असणाऱ्यांना शरीरामधील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो फायदा.