रक्षाबंधनाच्या निमित्ताने शेअर मार्केट बंद राहणार?

भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणजेच रक्षाबंधन हा 19 ऑगस्टला साजरा होणार आहे.

अशा स्थितीत या सणानिमित्त शेअर मार्केटला सुट्टी मिळणार का, असा प्रश्न शेअर मार्केट गुंतवणूकदारांच्या मनात आहे.

BSE-NSEच्या शेयर मार्केट हॉलिडे लिस्टनुसार, 19 ऑगस्टच्या रक्षाबंधनाच्या दिवशी कोणतीही सुट्टी घोषित केलेली नाही.

म्हणजेच आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स-निफ्टीमधील शेअर्सचे व्यवहार सुरु राहतील.

शेअर मार्केटच्या हॉलिडे लिस्टनुसार ऑगस्ट महिन्यात एकच सुट्टी होती, ती म्हणजे 15 ऑगस्ट.

मात्र, शेअर मार्केट हॉलिडे लिस्टनुसार 2 ऑक्टोबर, 1 आणि 15 नोव्हेंबर आणि 25 डिसेंबरला शेअर मार्केट बंद राहणार आहे.

VIEW ALL

Read Next Story