बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना सुरुवातीच्या काळात नकार मिळाला. लूक्समुळे या कालाकारांना भूमिका नाकारण्यात आल्या.
मात्र आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर टीपिकल हिरो किंवा हिरोईनप्रमाणे चेहरा नसतानाही या कलाकारांनी स्वत:चं स्थान निर्माण करुन कोट्यवधी फॉलअर्सचं प्रेम मिळवलं. अशाच कलाकारांबद्दल...
अभिनेता रणवीर सिंहने एका मुलाखतीमध्ये, 'मी गुड लुकिंग बॉय नसल्याने मला सुरुवातीला चित्रपट मिळत नव्हते,' असं म्हटलं होतं.
मध्यंतरी अभिनेता शाहीद कपूरने त्याला सुरुवातीला जवळपास 100 चित्रपटांमध्ये भूमिका नाकारण्यात आल्याचं सांगितलं. अखेर मोफत काम करुन तो पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकलेला.
अभिनेत्री विद्या बालनला तिच्या शरीरावरुन ऐकावं लागलं होतं. सुडौल शरीर नसल्याने विद्याला एकदा कमनशिबीही म्हणण्यात आलेलं.
अनुष्का शर्माला तर तिच्या वयाच्या 15 व्या वर्षापासून स्ट्रगल करावा लागला. अनेकांनी तिला नकार दिला. तुला अभिनय येत नाही असं अनेकांनी म्हटलेलं.
सान्या मल्होत्राही अनेकदा नकार सहन करावा लागला. तुला तुझ्या या लूकसहीत स्वत:ची ओळख बनवता येणार नाही असं तिला सांगितलं जायचं. मात्र सान्याने यातूनच प्रेरणा घेतली.
अनेकदा ऑडिशन देऊन निवड होऊनही तुला लीड रोल मिळू शकत नाही असं सांगितलं जायचं, असं राजकुमार राव म्हणाला आहे. सुंदर चेहरा आणि पिळदार शरीर असलेल्यांनाच संधी दिली जायची.
अभिनेत्री तापसी पन्नूलाही सुरुवातीला चित्रपटांमध्ये भूमिका दिल्या जात नव्हत्या. तू सुंदर दिसत नाही. तू ग्लॅमरस अभिनेत्री होणार नाही, असं म्हटलं जात होतं अशी माहिती तापसीने दिली.
अभिनेत्री माधुरी दिक्षितला तू हिरोईन मटेरिअल नाहीस. तू अभिनयाबद्दल विचार करायचं सोडून दे असं सांगून मनोरंजन सृष्टीत न येण्याचा सल्ला देण्यात आलेला.