दुनियेला फॅशन शिकवणारी उर्फी स्वत: कितवी शिकलीय?

तुम्ही सोशल मीडियात असाल आणि तुम्हाला उर्फी जावेद माहिती नाही असे होणार नाही.

उर्फी जावेद आपल्या बोल्ड आणि अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियात चर्चेत असते.

उर्फीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 4.2 फॉलोअर्स आहेत. उर्फीने आपल्या बोल्ड फॅशनमुळे ही प्रसिद्धी मिळवली आहे.

ज्या पद्धतीने ती कपडे परिधान करुन कॅमेरासमोर येते, त्यामुळे ती नेहमीच ट्रोल होत असते.

लोक काहीही म्हणूदेत पण माझ्या फॅशनला दुर्लक्षित करु शकत नाहीत असे ती म्हणते.

लखनौच्या एमईटी कॉलेजमधून तिने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे.

उर्फी जावेदकडे मास कम्युनिकेशनमध्ये डिग्री आहे.

उर्फीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही अभिनेत्री म्हणून केली होती. तिने अनेक सिरियल्समध्ये काम केले आहे.

उर्फी बिग बॉस सिझन 1 मध्ये सहभागी झाली होती. पण पहिल्या आठवड्यातच ती बाहेर पडली.

VIEW ALL

Read Next Story