बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याचा आज वाढदिवस आहे. आणि या खास क्षणी चित्रपटसृष्टिमधून सर्वच जण त्याला शुभेच्छा देत आहेत.
मात्र काही वर्षा पूर्वी रणबीर बद्दल एक खबर आली होती, ज्यात असं म्हंटलं गेलं की एका मोठ्या सुपरस्टार ने रणबीरला कानशिलात लगावली होती.
हा मोठा सुपरस्टार दूसरा तिसरा कोणी नसून सलमान खान आहे.
सलमान आणि रणबीर एकाच क्लब मध्ये पार्टी करत असताना एका गोष्टीवरून त्यांच्यात खूप बाचाबाची झाली होती.
हे भांडण इतकं विकोपाला गेलं की सलमानने रागाच्या भरात रणबीरला कानाखाली मारली होती.
सलमान आणि रणबीर कपूरला मग संजय दत्तनं शांत केलं होतं.
नंतर सलमानचे वडील सलीम खान यांनी रणबीर आणि ऋषि कपूर यांची माफी मागितली.
त्या वेळी रणबीर कटरिनाला डेट करत होता आणि तेव्हाच सलमान आणि रणबीरमध्ये भांडण झालं.