जगभरात अजब दिसणारी अनेक मुलं आहेत. एखाद्या वैद्यकीय समस्येमुळे ही मुलं इतरांपेक्षा वेगळी असतात.

त्यामुळेच काही वेळा दोन तोंडाची, 26 बोटांची अशी मुलं जन्माला आल्याचं पाहायला मिळतं.

काही मुलांना डॉक्टर सर्जरीच्या सहाय्याने सामान्य करतात, पण काही प्रकरणात मुलांना तसंच आयुष्य जगावं लागतं.

ब्राझीलमध्येही असंच एक मूल जन्माला आलं आहे. Joao Miguel असं या मुलाचं नाव आहे.

लहान वयातच त्याला मोठ्या माणसांप्रमाणे दाढी आणि मिशी आली आहे.

आपल्या घनदाट भुवया आणि केसांमुळे लहान वयातच तो एखाद्या 30-35 वयाच्या तरुणासारखा दिसतो.

मुलाच्या आई-वडिलांनी इंस्टाग्रामला babyjoao_miguel1311 नावाचं अकाऊंट तयार केलं आहे. तिथे त्याचे अनेक फोटो आहेत.

वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, मुलांच्या या स्थितीला Lanugo असं म्हणतात. हे केस वेळेनुसार निघून जातात.

VIEW ALL

Read Next Story