महालक्ष्मीच्या लग्नात विघ्न?

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मीने चित्रपट निर्माता रवींद्र चंद्रशेखर यांच्याशी दुसरं लग्न केलं.

May 27,2023

लग्नानंतर झाली होती ट्रोल

या लग्नामुळे महालक्ष्मीला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. तू पैशांसाठीच रवींद्र चंद्रशेखरशी लग्न केलं असा आरोप तिच्यावर करण्यात आला.

टीकेवर बाळगलं होतं मौन

मात्र यावर महालक्ष्मी किंवा रवींद्र चंद्रशेखर यांनी कधीच भाष्य केलं नाही. मात्र आता त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

महालक्ष्मीने शेअर केला नवा फोटो

घटस्फोटांच्या या चर्चांदरम्यान महालक्ष्मीने रवींद्र चंद्रशेखर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

'एकट्याचा फोटो टाकू नका'

फोटो शेअर करताना तिने म्हटलं आहे की, मी किती वेळा सांगितलं आहे की एकट्याचा फोटो टाकत जाऊ नका. यानंतर सोशल मीडियावर आपण वेगळे झाल्याची चर्चा सुरु होते.

'तुम्ही नेहमी करता चूक'

पण तुम्ही नेहमीच ही चूक करता असंही तिने पुढे म्हटलं आहे.

नेटकऱ्यांना दिलं उत्तर

या पोस्टसह महालक्ष्मीने आपल्या वैवाहिक आयुष्यात कोणतीही बाधा नसल्याचं सांगत नेटकऱ्यांना उत्तर दिलं आहे.

सर्वकाही सुरळीत

तसंच कितीही झालं तरी आपण नेहमी आपल्या पतीसह राहणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story