चेन्नई वि. गुजरात

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ग आणि गुजरात टायटन्सदरम्यान अंतिम सामना रंगणार आहे.

गुजरातचा दमदार प्रवास

चेन्नईने पहिल्या क्वालिफायर राऊंडमध्ये गुजरातचा पराभव करत थेट फायनल गाठली तरी गुजरातने मुंबईचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.

चेन्नई दहाव्यांदा फायनलमध्ये

आयपीएलच्या सोळा हंगामात चेन्नई सुपर किंग्सने तब्बल दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापैकी चारवेळा जेतेपद पटकावलंय.

चेन्नईचं पाचवं जेतेपद?

आता चेन्नई पाचव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झालीय. या सामन्यात सर्वांच लक्ष असेल ते एमएस धोणीच्या एका विक्रमावर

धोनीच्या नावावर मोठा विक्रम

एम एस धोनीचा आयपीएलमधला तब्बल 250वा सामना असणार आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरणार आहे.

दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा

धोनीनंतर सर्वाधिक आयपीएल सामने खेळण्याचा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्मा 243 सामने खेळलाय.

दिनेश कार्तिकही यादीत

त्यानंतर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आरसीबीच्या दिनेश कार्तिकचा नंबर लागतो. दिनेश कार्तिक तब्बल 242 सामने खेळला आहे.

मोदी स्टेडिअमवर फायनल

आयपीएल 2023 चा अंतिम सोहळा रविवारी म्हणजे 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.

तिकिटं हाऊसफुल्ल

संध्याकाळी साडेसात वाजता अंतिम सामन्याला सुरुवात होईल. यासाठीची तिकिटं आधीच हाऊसफुल झाली आहेत.

स्पर्धेचा भव्य-दिव्य समारोप

उद्घाटन सोहळ्याप्रमाणेच आयपीएलच्या समारोपाचा कार्यक्रमही भव्यदिव्य असणार आहे. यासाठी प्रसिद्ध रॅपर मनोरंजनाचा तडका लगावणार आहे.

VIEW ALL

Read Next Story