प्रजासत्ताक दिनानिमित्त पाहा हे 5 देशभक्तीपर सिनेमे..!

प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण हे काही गाजलेले सिनेमे आहेत.

बॉक्सऑफिसवर या सिनेमांनी धुमाकूळ घातला होता. त्याचबरोबर प्रेक्षकांच्या मनात घरही केलं होतं.

देशभक्तीवर आधारित हे गाजलेले सिनेमे कोणते..? चला पाहूया

'बॉर्डर'

1971 च्या भारत पाकीस्तान युद्धावर आधारीत हा सिनेमा 1996-97 मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमातील मुख्य कलाकार सोडले तर रणांगणावरचे सीन शुट हे खऱ्या सैनिकांना घेऊन करण्यात आले होते.

'द लिजेंड ऑफ भगत सिंग'

राजकुमार संतोष दिग्दर्शित 'द लिजेंड ऑफ भगत सिंग' सिनेमामध्ये अजय देवगणने मुख्य भुमिका साकारली होती.जालियानवाला बाग हत्याकांड ते भगत, सुखदेव आणि राजगुरु यांना बेकायदेशीरपणे ब्रिटीशांनी कशी फाशी दिली, याचा थरार या सिनेमातून मांडण्यात आला.

'चक दे इंडिया '

शाहरुख खानची प्रमुख भुमिका असलेल्या या सिनेमाने हॉकी कोचची गोष्ट मांडण्यात आली आहे. देशाला हॉकीमध्ये पराभूत करण्याकरीता पाकीस्तानशी हातमिळवणी केल्याच्या खोट्या आरोपातून स्वत:ला निर्दोष सिद्ध करणाऱ्या कबीर खानचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे.

'भाग मिल्खा भाग '

पद्मश्री पुरस्कार प्राप्त भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारीत 'भाग मिल्खा भाग' या सिनेमातून त्यांच्या देशभक्तीची आणि संघर्षाची कहाणी असुन या सिनेमाला फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले.

'लगान'

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'लगान' हा दुष्काळग्रस्त गावातील शेतकऱ्यांवर अत्याचार करणाऱ्या ब्रिटीश राजवटीवर भाष्य करणारा सिनेमा असून शेतकऱ्यांच्या संघर्षाशी गोष्ट मांडण्यात आली.

VIEW ALL

Read Next Story