अयोध्येतील राममंदिरात साामान्यांसाठी रामलल्लाचं दर्शन खुलं करण्यात आलं आहे. राम मंदिर सकाळी 7 ते 11:30 आणि दुपारी 2 ते 7 या वेळेत दर्शनासाठी खुले राहणार आहे

राम मंदिरात तीन वेळा आरती होणार आहे.प हिली आरती सकाळी 6.30 वाजता होईल. दुसरी दुपारी 12 वाजता आणि तिसरी संध्याकाळी 7:30 वाजता करण्यात येणार आहे.

राममंदिरातील मुख्य पुजारी रामलल्लाची आरती करतील. या पुजाऱ्यां पगार मिळतो का? किती मिळतो? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झालेत.

83 वर्षांचे आचार्य सत्येंद्र दास राम मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. जवळ 32 वर्ष ते पुजारी म्हणून काम करतायत. सुरुवातील त्यांना फक्त 100 रुपये पगार मिळत होता.

राममंदिराचा निर्णय येण्याआधी 1 ते 12 हजार रुपयांपर्यंत त्यांच्या पगारात वाढ होत गेली. त्यानंतर मुख्य पुजारी म्हणून त्यांची बढती झाली आणि त्यांचा पगार 15 हजार रुपये इतका झाला.

त्यानंतर मंदिरातील पुजारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यात आला आणि तो 25 हजार रुपयांपर्यंत झाला.

राम मंदिर उभारणीनंतर मुख्य पुजारी म्हणून आचार्य सत्येंद्र दास यांना आता 32900 रुपये इतका पगार मिळतो.

VIEW ALL

Read Next Story