समंथाने घेतला ब्रेक

समंथा रुथ प्रभू सध्या अभिनयापासून दूर आहे. तिने ब्रेक घेतला असल्याचं काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं. मात्र तिने आता तिच्या नव्या प्रेमाबद्दल खुलासा केला आहे.

नव्या प्रेमाबद्दल खुलासा

याच ब्रेकदरम्यान समंथाने आपल्या नव्या प्रेमाबद्दल खुलासा केला आहे. ती अभिनयापासून सध्या दूर असली तरी इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांशी कनेक्टेड आहे.

काही खास फोटो

मागील काही दिवसांपासून समंथा 'कुशी' चित्रपटातील तिचा सहकलाकार विजय देवरकोंडाबरोबरचे काही खास फोटो पोस्ट करत आहे.

कॅप्शनही चर्चेत

फार साऱ्या प्रेमासारखी काहीही गोष्ट अस्तित्वात नसते. तसेच फारसे प्रेम दिले तरी ते पुरेसे नसते, अशी कॅप्शन समंथाने फोटोला दिली आहे.

समंथाला उचलून घेतलं

'कुशी' चित्रपटाचा को-स्टार असलेल्या विजय देवरकोंडाने एका फोटोमध्ये समंथाला उचलून घेतल्याचं दिसत आहे.

कधी होणार प्रदर्शित?

समंथा आणि विजय देवरकोंडाची प्रमुख भूमिका असलेला 'कुशी' चित्रपट 1 सप्टेंबर रोजी देशभरामध्ये प्रदर्शित होतोय.

त्या फोटोंचा अर्थ काय?

मात्र नवीन प्रेम अशा अर्थाच्या कॅफ्शनसहीत समंथा विजय देवरकोंडाबरोबर जे फोटो शेअर करत आहे ते केवळ चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग आहे. तरीही तिने आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल अन्य एका पोस्टमध्ये उल्लेख केलाय.

...तर हे खरं प्रेम

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये समंथाने हातात पाण्याचं ग्लास पकडून फोटो पोस्ट केलाय. "स्पार्कलिंग वॉटर म्हणजेच साफ-स्वच्छ आणि चमकदार पाण्याच्या स्वरुपात नवं प्रेम सापडलं," अशी कॅप्शन या फोटोला दिली आहे.

पाणी आरोग्यासाठी फारच लाभदायक

स्पार्कलिंग वॉटरला कार्बोनेटेड वॉटर असंही म्हणतात. या पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साइडचे बुडबुडे स्पष्टपणे दिसतात. हे पाणी आरोग्यासाठी फारच लाभदायक असल्याने समंथाही या पाण्याच्या प्रेमात पडल्याचं दिसतंय.

तिला आरोग्यदायी गोष्टी प्रिय वाटतात कारण...

सध्या समंथा ऑटो इम्यून डिसऑर्डर मायोसिटिस या आजारावर उपचार घेत असल्याने सर्व आरोग्यदायी गोष्टी तिला प्रिय वाटत आहेत. तिने कोणत्याही व्यक्तीबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलेलं नाही.

1 वर्ष 6 महिन्यानंतर पुनरागमन

समंथाने तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत आहे. आता ती 'कुशी'च्या माध्यमातून 1 वर्ष 6 महिन्यानंतर पुनरागमन करत आहे.

VIEW ALL

Read Next Story