बुगडी, बाजूबंद अन् नाकात नथ...

प्राजक्ताचा मराठमोळा साज पाहिलात का?

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी हे घराघरात पोहोचलेलं नाव आहे. खदाखदा हसणाऱ्या प्राजक्ताने सर्वांच्या मनात घर केलंय.

प्राजक्तराज

प्राजक्ता अभिनय करते, सूत्रसंचालन करते, भरतनाट्यम शिकली आहे आणि शिवाय ती 'प्राजक्तराज' नावाचा दागिन्यांचा ब्रँडही चालवते.

सावळ्याची जणू सावली...

प्राजक्तराज ब्रँडचे काही फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत. सावळ्याची जणू सावली, सांज ये गोकूळी सावळी सावळी, असं कॅप्शन देखील तिने दिलंय.

गडी, नथ, कंबरपट्टा..

नुकतंच प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने बुगडी, नथ, कंबरपट्टा, पुतळीहार असे अलंकार घातले आहेत.

अलंकार

त्याचबरोबर.. बेलपानटिक, जोंधळेमणीगुंड, कोयरीतोडे, कुडी, बाजूबंद, गुलाबकाटा, मोहनमाळ, गहूतोडे, गजरीपैंजण, असे अलंकार प्राजक्ताने परिधान केले आहेत.

ह्रदयी प्रीत जागते..

ह्रदयी प्रीत जागते.. जाणता अजाणता, असं म्हणत प्राजक्ताने काही फोटो शेअर केले आहेत.

स्वप्नपूर्ती

नुकताच प्राजक्ता माळीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिची स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद व्यक्त केला.

निसर्गाच्या सानिध्यात घर

डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे,एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं, असं म्हणत प्राजक्ताने तिच्या कर्जतमधील घराचा फोटो देखील शेअर केला आहे.

VIEW ALL

Read Next Story