पूर्वीपेक्षा आजकाल मुलांना स्मार्टफोनचा वापर जास्त आहे. कोविडच्या काळात त्याचा वापर थोडा वाढला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
जगभरात 13 ते 17 वर्षे वयोगटातील मुले सर्वाधिक अश्लिल व्हिडीओ पाहतात असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
सर्वप्रथम, तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल, सेटिंगमध्ये पोहोचल्यानंतर, तुम्हाला Private DNS शोधावे लागेल.
Private DNS टॅप केल्याने तुम्हाला Private DNS Mode दिसेल, त्यावर पुन्हा टॅप करा
यानंतर, Automatic Private DNS वर क्लिक करा.
येथे तुम्हाला Private DNS तयार करावा लागेल ज्यावर तुम्हाला family.adguard-dns.com टाईप करावे लागेल
त्यानंतर adguard-dns.com आणि ते सेव्ह करावे लागेल
असे केल्याने, त्या स्मार्टफोनवरील 18 प्लस कंटेंट मायनस होईल
तुमच्या मुलाला अश्लिल व्हिडीओ पाहण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही अॅप्स देखील वापरू शकता. बार्क आणि ऑरा नावाची काही अॅप्स आहेत जी तुम्हाला स्मार्टफोनवर इन्स्टॉल करायची आहेत.
हे अॅप्स केवळ फोनवर अश्लिल व्हिडीओपासून रोखत नाहीत तर कोणत्याही वेळी तुम्ही तुमच्या मुलाच्या फोनवर होणार्या कोणत्याही कृतीवर नजर ठेवू शकता. (सर्व फोटो - freepik.com)