Personality Test

तुमचा स्वभाव तुमच्या चेहऱ्याचा आकार कसा सांगेल?

स्वभावाचं गुपित

तुमच्या चेहऱ्याचा आकार हा तुमच्या स्वभाव इतरांना सांगू शकतो. अगदी तुमच्या करिअरचं गुपितही त्यांना समजू शकतं.

एक शास्त्र

एखाद्या व्यक्तीचं वर्तन, चारित्र्य, व्यक्तिमत्व आणि भविष्य हे त्याचा शरीराच्या अवयावांवरुन आपल्या समजू शकतं. हे एक शास्त्र आहे.

तुमचा स्वभाव

प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याची ठेवण ही वेगवेगळी असते. तुमचा चेहऱ्याचा आकारावरुन तुमचा स्वभाव समजतो.

व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, वेगवेगळ्या आकाराचा चेहरा काय व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करतो आणि तुमच्याबद्दल काय सांगतो.

चौरस चेहरा (square face)

ही लोक अतिशय वेगवान, चपळ आणि महत्त्वाकांक्षी असतात. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काही करतात. इतरांवर छाप पडणारे असतात. ही लोक खूप हुशार असून त्यांच्यामध्ये नेतृत्वगूण असतो. या व्यक्ती खूप भाग्यवान असतात.

गोल चेहरे (Round faces)

या व्यक्ती स्वभावाने भावूक असतात. ज्या व्यक्तीवर हे जीव लावतात, प्रेम करतात त्यांच्यासाठी काहीही करतात. या व्यक्ती एक चांगला जोडीदार असतात आणि दिसायला देखणे असतात.

त्रिकोणी चेहरा (Triangular face)

या व्यक्ती सर्जनशील आणि बुद्धिमान असतात. या लोकांना लवकर राग येतो. उग्रही असून ही लोक सहसा दुबळे असतात.

अंडाकृती चेहरा (Oval face)

कलात्मक आणि अतिशय आकर्षक असतात. या व्यक्ती स्वतःची ओळख निर्माण करतात. मात्र या व्यक्ती आरोग्याने कमकुवत असतात.

लांब चेहरा (long face)

लांब आणि पातळ चेहऱ्याची लोक ही शारीरिकदृष्ट्या प्रबळ असतात. या लोकांना निटनिटकं राहिला आवडतं. ही लोक हट्टी असतात. कुठल्याही परिस्थितीत या व्यक्ती स्वतःला सिद्ध करतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story