'शाम सवेरे तेरी यादें आती हैं, आके दिल को मेरे यूँ तड़पाती हैं' या गाण्याने एकेकाळी आबालवृद्धांना भूरळ घातली होती.

आजही हे गाणं तरुणाईचं फेव्हरेट आहे. तरुणांचे फेव्हरेट सिंगर लकी आता 64 वर्षांचे झाले आहेत.

लकी आली यांची गाणी आजही प्रचंड लोकप्रिय आहेत. वयाच्या 64 वर्षी लकी अली यांचा लूक एकदम बदलला आहे.

लकी अली सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपले फोटो आणि व्हिडिओ ते नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात.

आता त्यांनी आपले नवे फोटो शेअर केले असून त्यांचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.

नव्या फोटोत लकी अली खाकी पँट आणि त्याच रंगाच्या जॅकटमधला आहे. पण लांब दाढीमुळे त्यांना ओळखता येत नाहीए.

लकी अली यांचा नवा फोटोही लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. एकदम साधा लूक चाहत्यांचा चांगलाच भावला आहे.

तरुणपणात लकी अली यांच्या गाण्याबरोबर त्यांच्या दिसण्यावर लोकं फिदा होती. विशेषत: त्यांच्या फॉलोअर्समध्ये मुलींची संख्या जास्त होती.

लकी अली बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि कॉमेडिअन मेहमूद यांचे पूत्र आहेत. लकी अली यांनी अभिनयाची वाट न धरत गाण्यात आपली कारकिर्द केली.

लकी अली यांची 'आ भी जा', 'ओ सनम', 'हैरत संग' ही गाणी प्रचंड गाजली. नुकतंच लकी अली यांचं Sayyah हे गाणं रिलीज झालं आहे

VIEW ALL

Read Next Story