भाजपचे खासदार सांवरलाल जाट यांचं निधन
नवी दिल्ली : मोदी सरकारमधील जल संधारण राज्य मंत्री आणि अजमेरचे भाजपचे खासदार सांवरलाल जाट यांचं दिल्लीत निधन झालं. मागच्या महिन्यात २२ जुलैला राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्यक्रमात सांवरलाल जाट बेशुद्ध होऊन पडले होते. त्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सांवरलाल जाट अजमेरमधून लोकसभा खासदार आहे. ते मोदी सरकारमध्ये जलसंधारण राज्य मंत्री देखील होते. ९ नोव्हेंबर २०१४ ते 5 जुलै २०१६ पर्यंत ते जलसंधारण राज्य मंत्री होते. सांवरलाल यांच्या जन्म १९५५ मध्ये गोपालपुरा गावात झाला होता.
१९९३, २००३ आणि २०१३ मध्ये ते राजस्थान सरकारमध्ये देखील मंत्री होते. २०१४ मध्ये त्यांना अजमेरमधून लोकसभेसाठी तिकीट मिळालं. त्यानंतर त्यांना मंत्रीपद मिळालं पण मंत्रीमंडळात फेरबदल झाल्यानंतर त्यांचं मंत्रीपद गेलं होतं.
भाजपचे खासदार सांवरलाल जाट यांचं निधन