पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऋषी सुनक, जो बायडन अशा जागतिक नेत्यांना किती पगार मिळत असेल? कधी विचार केलाय का?
अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांना वार्षिक 4 लाख डॉलर म्हणजेच 3 कोटी 34 लाख इतका पगार मिळतो.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 2 लाख 12 हजार डॉलर म्हणजेच 1.77 कोटी इतका पगार मिळतो.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अॅंथनी एल्बानीज यांना वर्षाला साधारण 5 लाख 50 हजार डॉलर इतका पगार मिळतो.
स्वित्झरलॅंडच्या पंतप्रधानांना वार्षिक 4 लाख 95 हजार डॉलर म्हणजेच 4 कोटी 13 लाख इतका पगार दिला जातो.
सिंगापूरच्या पंतप्रधानांना सर्वाधिक पगार मिळतो. लॉरेस वॉंग यांना वार्षिक 2.2 मिलियन डॉलर म्हणजेच 18 कोटी 37 लाख इतका पगार मिळतो.
शी जिनपिंग यांना वार्षिक 11 हजार 385 युआन (135 डॉलर) इतका पगार मिळतो, असे म्हटले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 लाख 66 हजार इतका पगार मिळतो. जो वार्षिक 20 लाख रुपये इतका आहे.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)