जगभरात वनुआतू इथं कर्मचाऱ्यांना कमीत कमी वेळासाठी काम करावं लागतं. त्यांनी आठवड्यातून फक्त 24.7 तास काम करणं अपेक्षित आहे. ILO च्या माहितीत याबाबतचा खुलासा करण्यात आला आहे.
किरीबाटी आणि मायक्रोनेशियामध्ये कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला अनुक्रमे 27.3 आणि 30.4 तास काम करावं लागतं.
रवांडा आणि सोमालियामध्ये कार्यालयीन वेळा आठवड्यास अनुक्रमे 30.4 आणि 31.4 तासांपुरता सीमित आहेत.
नेदरलँड्स आणि इराकमध्ये नोकरीच्या ठिकाणी अनुक्रमे 31.6 आणि 31.7 तास काम करणं अपेक्षित आहे.
इथिओपिया आाणि कॅनडामध्ये कर्मचाऱ्यांनी 31.9 आणि 32.1 तास काम करणं अपेक्षित आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इथं कर्मचाऱ्यांनी दर आठवड्याला अनुक्रमे 32.3 आणि 33 तास काम करणं अपेक्षित आहे.