पृथ्वीच्या, या धरणीच्या उदरात काय दडलंय याचा शोध घेण्यासाठी संशोधक जीवाचा आटापिटा करत आहेत.
याचदरम्यान एका युट्यूबरनं अमेरिकेतील सर्वात खोलवर असणाऱ्या गुफेमध्ये कॅमेरा पाठवला होता. एलिसन असं या गुफेचं नाव असून तिची खोली 1063 फूट.
12 मैल खोल असणाऱ्या या गुफेची खोली सर्वांनाच धडकी भरवणारी. याच गुफेची काही छायाचित्र नुकतीच समोर आली आहेत.
जिथं एक माणूस या गुफेत खोलवर जाताना दिसत आहे. तो जसजसा पुढे जात आहे तसतशी गुफेची अद्भूत रुपं समोर येत आहेत.
पृथ्वीचे विविध पदर असतात असं म्हणतात याच पदरांचा, नैसर्गिक थरांचा वेगळाच भाग या फोटोंमध्ये पाहता येत आहे.
थोडक्यात धरणीच्या उदरात दडलेली गोष्ट पाहताना अनेकांचेच डोळे विस्फारत आहेत. (छाया सौजन्य- इन्साग्राम)