फ्रान्सच्या फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. 70 व्या वयात त्यांची संपत्ती 99.5 अब्ज डॉलर आहे. L’Oreal द्वारे त्यांनी घवघवीत यश मिळवलंय.
अमेरिकेच्या ॲलिस वॉल्टन या यंदाच्या वर्षातील दुसऱ्या श्रीमंत महिला आहेत. वॉलमार्टमधून त्यांनी 74 व्या वर्षी 72.3 अब्ज डॉलर कमवले आहेत.
कोच इंडस्ट्रीजच्या प्रमुख ज्युलिया कोच आणि कुटुंब यांची संपत्ती 64.3 अब्ज डॉलर आहे. वयाच्या 61 व्या वर्षी त्या जगातील तिसऱ्या श्रीमंत महिला ठरल्या.
अमेरिकेच्या जॅकलिन मार्स या जगातील चौथ्या श्रीमंत महिला आहेत. त्यांची संपत्ती तब्बल 38.5 अब्ज डॉलर आहे. त्यांचं वय सध्या 84 वर्ष आहे.
अमेझॉनच्या प्रमुखांच्या विभक्त पत्नी मॅकेन्झी स्कॉट या देखील जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत आहेत. त्यांची 53 व्या वर्षी संपत्ती ही 35.6 बिलियन डॉलर आहे.
या यादीत एका भारतीय महिलेचा देखील समावेश आहे. सावित्री जिंदाल आणि कुटुंब यांची एकूण संपत्ती 33.5 अब्ज डॉलर आहे.
स्वित्झर्लंड आणि इटलीच्या राफेला अपोंटे-डायमंट यांची 79 व्या वर्षी एकूण संपत्ती 33.1 अब्ज आहे. शिपिंग क्षेत्रात यांचं मोठं नाव आहे.
कॅसिनोच्या माध्यमातून 78 व्या वर्षी 32 अब्ज डॉलर संपत्ती नावावर असलेल्या मिरियम एडेलसन देखील श्रीमंताच्या यादीत आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये खाणकाम व्यवसायात नाव कमावणाऱ्या जीना राइनहार्ट यांची संपत्ती 30.8 बिलियन इतकी आहे.
फिडेलिटी इन्व्हेस्टमेंटच्या प्रमुख अबीगेल जॉन्सन यांनी 62 व्या वर्षी 29 अब्ज डॉलरची संपत्ती कमवली आहे.