औली येथे तुम्हाला थंडगार आणि निसर्गरम्य वातावरण मिळेल. येथे अनेक एडवेन्चर्स एक्टिव्हिटीज आहेत.
साऊथ इंडिया फिरायची इच्छा असेल तर तुम्ही कुर्ग येथे जाऊ शकता. येथेही तुम्हाला हिरवंगार वातावरण मिळेल.
मस्त समुद्रकिनाऱ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर लक्षद्विप ही एक चांगली जागा आहे.
यंदाच्या मौसमात तुम्ही मेघालय या ठिकाणाला भेट देऊ शकता. हा प्रदेश उत्तर ईशान्य भागात आहे जेथे तुम्हाला सुंदर असं निसर्गरम्य वातावरण मिळेल.
जम्मू काश्मिर नजीक असलेल्या गुलमर्ग या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या. यावेळी तुम्हाला बर्फाचा आस्वाद घेता येईल.
नैनिताल या ठिकाणीही तुम्ही भेट देऊ शकता. ही जागा तुम्हाला लो बजेटमध्येही फिरता येईल.
हिमाचल प्रदेशातील सर्वात रोमॅण्टिक जागा म्हणजे डलहाऊजी. येथे तुम्ही तर नक्कीच भेट द्यायला हवी.