संपूर्ण भांडण 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात झाले ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने 18 धावांनी विजय मिळवला.
या वादामुळे विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघांनाही आर्थिक फटका बसला आहे कारण त्यांच्या मॅच फीमध्ये 100 टक्के आणि नवीन उल हकच्या मॅच फीमध्ये 50 टक्क्यांनी कपात करण्यात आलीये.
या वादाचा सूत्रधार कोण, नवीन उल हक, गौतम गंभीर की विराट कोहली हे काळच ठरवेल, असं हरभजन म्हणाला.
हरभजनने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील 2013 च्या आयपीएल संघर्षाची आठवण करून दिली आणि सांगितले की, जे घडले ते टाळता आले असतं
हरभजन सिंगने सांगितलं, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांचा वाद फार जुना आहे
गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या वादावर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने आपलं मत या वादावर मांडलं आहे
1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात बंगळुरूच्या विराट कोहली आणि दिल्लीचे मेटॉर गौतम गंभीर यांच्यातील वाद मैदानावर चव्हाट्यावर आला.