जगभरात येणाऱ्या आपत्ती, गरिबी, हवामानातील बदल यामुळंही कॉलराचा संसर्ग वाढताना दिसत आहे.
कॉलराची रुग्णसंख्या कमी झालेली असतानाच 2022 पासून हा प्रादुर्भाव वाढल्यामुळं आरोग्य यंत्रणांपुढची चिंता वाढली आहे.
विषाणूजन्य पदार्थ मानवी संपर्कात आल्यास संसर्गाचा धोका वाढतो.
दुषित पाणी किंवा माश्या- किटक बसलेले उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्यास कॉलराचा धोका संभवतो.
जगातील जवळपास 22 देशांमध्ये कॉलरा धुमाकूळ घालत असून, आतापर्यंत 1 अब्जाहून अधिकांना हा संसर्ग झाला आहे.
कोरोनाचं (Corona) सावट पाठ सोडत नाही तोच कॉलराच्या संसर्गानं डोकं वर काढलं आहे. (Cholera Outbreak )