जग तिसऱ्या युद्धाच्या उंबरठ्यावर? पाहा इस्रायल- हमासला 'या' राष्ट्रांचा पाठिंबा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेनं विमानवाहू युद्धनौकाही इस्रायलच्या मदतीसाठी पाठवल्या आहेत.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही इस्रायलला आपल्या वतीनं साथ दिली आहे
फ्रान्सकडूनही पॅलेस्टाईनच्या हल्ल्यांचा निषेध करत इस्रायलला पाठिंबा देण्यात आला आहे.
इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रांमध्ये ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, जर्मनी, कॅनडा, पोलंड, स्पेन आणि युरोपीय संघ राष्ट्रांचा समावेश आहे.
इराणनं मात्र पॅलेस्टाईनला पाठिंबा दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दक्षिण आफ्रिका, येमेन, सौदी अरब, कतार या राष्ट्रांकडूनही पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यात आला आहे. भारताची मात्र इथं तटस्थ भूमिका पाहायला मिळत आहे.