डॉली चहावाल्याने थेट मालदीवमध्ये टाकला चहाचा स्टॉल

नागपूरमधील डॉली चहावाला आता चांगलाच प्रसिद्धीस आला आहे.

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी डॉली चहावाल्याच्या टपरीवर गेल्यापासून त्याची प्रसिद्धी वाढली आहे.

दरम्यान आता डॉली चहावाला थेट मालदीवमध्ये दाखल झाला आहे.

डॉली चहावाल्याने मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यावर चहाचा स्टॉल उभा केला होता.

त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

डॉली चहावाला समुद्रकिनारी चहा तयार करत असताना पर्यटकही त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते.

चहा बनवल्यानंतर डॉली चहावाल्याने तेथील पर्यटकांना हा चहा दिला.

दरम्यान डॉली चहावाल्याचा व्हिडीओ पाहून नेटकरीही आश्चर्यचकित झाले आहेत.

काहींनी तर आता आपणही चहाची टपरी टाकली पाहिजे असं उपहासात्मकपणे म्हणत आहेत.

VIEW ALL

Read Next Story