बऱ्याचदा सोशल मीडियावर एखादा फोटो शेअर केला की, जोडप्यांमध्ये, मित्रांमध्ये वाद हा होतोच. वाद झला नाही, तरी अनेकदा नकारात्मक भावना उगाचच मन खाऊ लागते. पण, असं नेमकं का होतं माहितीये?
यामागे तीन वेगळी कारणं आहेत. एक म्हणजे इतरांमध्ये असणाऱ्या अंतरिक उर्जा आणि लहरींमुळं समोरच्या व्यक्तीवर परिणाम होतो. अनेक निरीक्षणपर अहवालांमध्येही ही बाब नमूद करण्यात आली आहे.
फोटो पोस्ट केल्यानंतर पाहणाऱ्यांच्या मनात विविध भावना निर्माण होतात आणि त्या नकळत फोटो पोस्ट करणाऱ्यांपर्यंत पोहोचतात. मानसशास्त्रानुसार कमकुवत मनाच्या मंडळींवर याचा अधिक परिणाम होतो.
फोटो पोस्ट करताना नकळत मेंदूला असे संकेत दिले जातात की आता भांडणं होणार आहेत. कारण, अशीच एक धारणा मनात असते आणि त्याचाच परिणाम म्हणजे वाद.
भांडणांचं खापर कुठेतरी फोडायचं असतं. स्वत:वर वादाची जबबादारी घ्यायची नसते. त्यामुळे ही भांडणं होतात. फोटोंचा अल्बम हतात घेऊन पाहताना कधी वाद होत नाहीत, पण मग पोस्ट केल्यावरच का होतो वाद? विचार केलाय?
काही गोष्टींमागे विज्ञान तर काही गोष्टींमागे मानवी स्वभावही कारण आहे असं निरीक्षणातून समोर येतं आणि त्याचा स्वीकार केला गेला पाहिजे, कारण वाद किमान कमी होतील...