सोनं एवढं महाग का असतं?

तुम्हालाही कधीतरी असा प्रश्न पडलाच असेल ना?

एवढी किंमत का मोजावी लागते

आपल्यापैकी अनेकांना सोन्यासाठी एवढी किंमत का मोजावी लागते असा प्रश्न पडलाच असेल.

मूळ कारणं कोणती?

सोनं महाग असण्याची मूळ कारणं कोणती आहेत हे आपण जाणून घेऊयात..

दागिणे आणि गुंतवणूकही

सोन्याच्या दागिण्यांबरोबरच या पिवळ्या धातूकडे गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातूनही पाहिलं जातं.

जगभरात मागणी

सोनं हा जगभरामध्ये मागणी असलेला मात्र दुर्मिळ धातू आहे.

सोन्याची किंमत अधिक का

मुळात सोनं फार दुर्मिळ असल्याने आणि त्याला अधिक मागणी असल्याने त्याची किंमत अधिक असते.

मोजक्या जागी सापडतं सोनं

जगभरातील अगदी मोजक्या देशांमध्ये आणि अल्पप्रमाणात सोनं खनिज स्वरुपात सापडतं.

महागडी प्रक्रिया

कच्च्या स्वरुपातून सोन्यापासून वापरता येण्याजोगं सोनं तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया फारच महागडी असते.

अनोखा गुणधर्म

इतर धातूंप्रमाणे सोनं ऑक्सिडाइज होत नाही. हा सोन्याचा सर्वात वेगळा गुणधर्म आहे.

कोणत्याही ऋतुचा परिणाम नाही

सोन्यावर कोणत्याही ऋतुचा विशेष परिणाम होत नाही. त्यामुळे ते कधीही वापरता येतं. इतर धातुंच्या तुलनेत हे सोन्याचं वेगळेपण आहे.

यामुळेही वाढते किंमत

मागणी आणि पुरवठा या दोन गोष्टींमुळेही सोन्याची किंमत अनेकदा वाढते.

जगभरामध्ये सोन्याला मागणी

जगभारतील अनेक देशांमध्ये सोन्याला मागणी असल्याने गव्हरमेंट रिझर्व्ह म्हणून अनेक देश काहीप्रमाणात सोन्याचा साठा करुन सरकारी तिजोरीत म्हणजेच सरकारच्या ताब्यात ठेवतात.

VIEW ALL

Read Next Story