लॉरेंजोच्या दाव्यानुसार त्याने हा खजिना 2021 सालीच शोधला होता. मात्र त्यासंदर्भातील खुलासा त्याने आता केला आहे.
डच म्युझियम ऑफ इंटिटेने सोशल मीडियावर या खजान्याचे फोटो शेअर केले आहेत.
नेदरलँड्समधील नियमानुसार या खजिन्यावर या व्यक्तीचाच हक्क राहणार आहे. मात्र हा सर्व ऐवज संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवावा लागणार आहे.
या खजन्यामध्ये सापडलेल्या ऐवजामध्ये 4 पेंडण्ट आहेत. यामध्ये सोन्याची 2 पानं आणि चांदीची 39 नाणीही आहेत.
हा खजिना मध्ययुगीन कालामधील असून मुद्दाम तो जमिनीमध्ये पुरण्यात आला होता. विशेष म्हणजे एका मेटल डिटेक्टरच्या मदतीने लॉरेंजोने हा खजिना शोधला.
लहानपणापासूनच लॉरेंजो ऐतिहासिक ठिकाणी खोदकाम करणाऱ्यांबरोबर उत्सुकतेपोटी जायचा. वयाच्या 10 व्या वर्षांपासून लॉरेंजो खजिना शोधण्याचा प्रयत्न करत होता.
नेदरलँड्समधील हुडवुग शहरामध्ये लारेंजोला हा खजिना सापडला आहे. हा खजिना सापडल्याने रातोरात लॉरेंजोची नशीब पालटलं आहे.
लॉरेंजो रुजएट असं या 27 वर्षीय मुलाचं नाव असून तो मागील 17 वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी खजिन्याचा शोध घेत होता.
नेदरलँड्समधील एका व्यक्तीने 1000 वर्षांपूर्वीचा खजिना शोधून काढला आहे. हा खजाना मध्ययुगीन काळातील असल्याचं सांगितलं जात आहे.