दिवा-अगरबत्ती ओवाळा. दोन्ही बाजूला तुम्ही समया देखील लावू शकता. दर दिवशी सकाळ-संध्याकाळ आरती करून पूजा करा. परातीत/ टोपल्यात पेरलेल्या धान्यावर दिवसातून दोनदा थोडे थोडे पाणी घाला. नऊ दिवसांत ही धान्य छान वाढतात. त्याच्या वाढीनुसार आपल्या घराण्याची भरभराट होते, असे मानले जाते.
नारळावर बारीक काडी लावून त्यावर फुलं ठेवा. कलशाला हळद कुंकु, गंध अक्षता वाहून पूजा करा. कलशावर तुम्ही चुनरी देखील चढवू शकता. वेणी, गजरा घाला.
कलश तयार करताना त्यात हळद-कुंकू, सुपारी, अक्षता, दुर्वा, सव्वा रूपया घाला. कलशाला हळदी कुंकुवाच्या प्रत्येकी 5 बोटं ओढा. कलशामध्ये नागवेलीची किंवा पाच प्रकारच्या पाच विविध पानांच्या मध्ये नारळ ठेवून सजवा. कलश परातीत किंवा टोपल्यात ठेवून ते चौरंगावर ठेवा.
घटस्थापना करताना घट पाटावर किंवा चौरंगावर मांडला जातो. त्यामुळे चौरंग किंवा पाटा खाली रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू घाला. चौरंग/पाटावर लाल वस्त्र अंथरा. टोपली किंवा पराती मध्ये माती घालून त्यात मिश्र धान्य पेरा. त्या मधोमध कलश ठेवा.
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 22 मार्च ला सकाळी 06:29 ते 07:39 पर्यंत असणार आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र शुक्ल पक्षाची (gupt navratri 2023) उदय तिथीनुसार चैत्र नवरात्रीची सुरुवात 22 मार्च 2023 पासून होणार आहे.