या कारची किंमत 56.90 लाखांपर्यंत असणार आहे.
ब्लॅक स्टोन, फ्यूजन रेड, थंडर ग्रे, फजॉर्ड ब्लू, सिल्व्हर डाउन, क्रिस्टल व्हाइट, सेज ग्रीन आणि ऑनिक्स ब्लॅक अशा कलर ऑप्शनमध्ये ही कार मिळणार आहे.
14 इंचांचा इन्फोटेन्मेंट सिस्टीम, 5 ड्राइव्हिंग मोड आहेत.
कारमध्ये मुबलक केबिन स्पेस आहे. यामुळे मागे आणि पुढे बसताना खूप कम्फर्टेबल वाटेल.
टेल लॅम्पमध्ये व्हर्टिकल एलईडी लॅम्पचा वापर करण्यात आला आहे.
या कारचं डिझाइनही आकर्षक आहे. कारचं फ्रण्ट ग्रील काढून त्याजागी क्लोज पॅनल देण्यात आले आहे.
कारची बॅटरी 8० टक्के चार्ज होण्यासाठी दोन तासांपर्यंतचा कालवधी लागतो.
एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 477 किलोमीटरपर्यंत धावणार.
वॉल्वो सी 40 रिचार्ज या कारमध्ये कंपनीने 79 किलोवॉटचं बॅटरी पॅक दिला आहे.
या कारमध्ये अनेक भन्नाट फिचर्स असल्याचा दावा कंपनीने केला आहे.