गुळ खाण्याचे 'हे' मोठे फायदे, अनेक आजार असे पळून जातील

Jun 15,2023

गुळाचे अनेक फायदे

Jaggery Benefits : गुळाचे अनेक फायदे तुम्हाला माहीत आहेत का? योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. तसेच साखरेऐवजी गुळ खाण्यास प्राधान्य द्या. गुळामध्ये पोषक घटक अधिक प्रमाणात असल्याने गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

गुळामध्ये प्रोटीन

गुळामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी 6, फॉलेट, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस आणि सेलेनिअम यासारख्या पोषक घटकांचा समावेश असतो. यामध्ये फॅट्स अजिबात नसतात. त्यामुळे त्याचे अनेक फायदे आहेत.

चर्बी कमी होते

Jaggery Benefits : गुळासोबत आलं खाल्याने अनेक प्रकारचे रोग दूर होतात. शरीरात जमा झालेली चर्बी कमी करण्यासाठी गुळ आणि आल्याचा चहा प्या. त्यामुळे शरीरावर जमा झालेली ही चर्बी कमी होते.

संधीवात दूर होईल

गुळ आणि आलं एकत्र समप्रमाणात घेऊन त्याचे लाडू बनवा. एक लाडू दररोज खा. त्यामुळे संधीवाताचा आणि घुडगेदुखीचा त्रास कमी होईल.

कोरडा खोकला

कोरडा खोकला लागला असेल तर गुळ आणि आलं खाल्याने कमी होण्यास मदत होते.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते

डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुळ आणि आलं फायद्याचे आहे. आलं आणि गुळ एकत्र खाल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि डोळे चांगले राहतात.

फिटनेसाठी

गुळामध्ये पोटॅशिअमची मात्रा भरपूर असते. पोटॅशिअम आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटची पातळी संतुलित ठेवण्याचे कार्य करते. त्यामुळे तुमचा फिटनेस राहतो.

बद्धकोष्ठतेची समस्या

पचनप्रक्रिया सुरळीत सुरु राहण्यास उपयुक्त असलेल्या पोषण तत्त्वांचा गुळामध्ये साठा आहे. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. विशेषतः बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.

पोटदुखी कमी होते

मासिक पाळीतील त्रास कमी होतो. शरीरास आवश्यक असणारे अनेक प्रकारचे पोषक घटक गुळामध्ये आढळतात. मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी कमी करण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

VIEW ALL

Read Next Story