सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक स्कूटर्ससोबत इलेक्ट्रिक सायकलचा देखील ट्रेंड वाढत आहे.
इलेक्ट्रिक बाईक चालवणे आणि त्यांची देखभाल करणे खूप सोपे आहे.
MotoVolt च्या नवीन URBN e-Bike ची किंमत 46,999 ते 54,999 पर्यंत आहे.
या इलेक्ट्रिक बाईक निर्मात्याचा दावा आहे की, ही बाईक 7 पैसे प्रति किलोमीटर दराने धावते.
या बाईकची बॅटरी संपली तरी तुम्ही पॅडल राइडिंगद्वारे ती चालवू शकता. या बाईकचे वजन फक्त 40 किलो आहे.
ही बाईक चालवण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स किंवा नोंदणीची गरज नाही. हिचा टॉप-स्पीड फक्त 25 किमी आहे.